top of page
  • harshcartoonist

Boom.. Boom..बुमराहचा...💥 खतरनाक यॉर्कर!!

असा उडवला बेअरस्टोचा त्रिफळा.

  • India vs England 4th test : Boom Boom दुमराह; जसप्रीतच्या सुसाट वेगानं उडवले दांडे...

Ind vs Eng 4th Test: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारतीय संघाने यजमानांना ३६८ धावांचे मोठे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांचा कस लागला. इंग्लंडने पहिल्या सत्रात ५४ धावांची भर घातली, तर भारताला केवळ दोन बळी घेतला आले. पण त्यानंतर दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या तासाभराच्या खेळातच भारतीयांनी चार बळी टिपले. त्यापैकी जसप्रीत बुमराहने जॉनी बेअरस्टोचा उडवलेला त्रिफळा विशेष आकर्षण ठरला.


दुसऱ्या सत्राच्या सुरूवातीला रविंद्र जाडेजाने हसीब हमीदला तर बुमराहने ओली पोपला झटपट माघारी धाडले. त्यानंतर आलेला जॉनी बेअरस्टो चौथा चेंडू खेळत होता. जसप्रीत बुमराहने अतिशय वेगवान आणि अचूक यॉर्कर चेंडू टाकत बेअरस्टोला माघारी धाडले. आधीचे ३ चेंडू बेअरस्टोला चांगल्या पद्धतीने खेळता आले नव्हते. तशातच खेळपट्टीवर नवीन असताना त्याला अचानक बुमराहच्या वेगवान अशा यॉर्करचा सामना करणं निव्वळ अशक्य ठरलं. काही समजेपर्यंत तो क्लीन बोल्ड झाला आणि शून्यावर माघारी परतला.

40 views

Comments


bottom of page