top of page
harshcartoonist

अण्णा हजारेंच्या सरकारला सवाल


सगळं राहिलं बाजूला अण्णांना काळजी फक्त मंदिरांची ... 🤔🤔🤔


करोनाच्या पार्श्वभूमीवर दीर्घ काळापासून बंद असलेली राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी सध्या एकीकडे राज्यातील विरोधी पक्ष चांगला आक्रमक होत असताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे काहीच दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांनी देखील याचबाबत राज्य सरकारला मंदिरं उघडण्याचा इशारा दिला होता.


अण्णा हजारेंच्या सरकारला सवाल

“मंदिर बचाव कृती समितीने मोठं आंदोलन उभं करावं. प्रसंगी जेलभरो आंदोलन करावं. या आंदोलनात मी अग्रभागी असेन”, अशी ग्वाही अण्णा हजारे यांनी दिली होती. नगरमधील मंदिर बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे हजारे यांची भेट घेऊन मंदिर उघडण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती केली होती.

मंदिर बचाव समितीच्या या आंदोलनाला पाठिंबा देत अण्णा हजारे म्हणाले होते कि, “सध्या दारूची दुकानं, हॉटेल्स उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. तेथेही मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते. या गर्दीमुळे करोना संसर्ग पसरत नसेल तर मंदिरं उघडल्याने संसर्ग कसा होईल?”, असा सवालही अण्णा हजारे यांनी केला होता.

43 views

Comments


bottom of page