Jailer Movie Review Rajinikanth Superstar : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांचा कोणताही नवा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांच्या मोठा कट आऊट्सला दुग्धाभिषेक केला जातो. टॉलीवूडच्या प्रेक्षकांसाठी ते देव आहेत.
त्यांना देवाचा दर्जा दिला गेला आहे. आजवर आपल्या वेगवेगळ्या चित्रपटांतून कोट्यवधी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या थलायवाची गोष्टच काही और आहे. हे सगळं का आहे याची प्रचिती जेलरमधून आल्याशिवाय राहत नाही.
दोन वर्षानंतर रजनीकांत यांचा जेलर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षक आणि रजनी यांचे चाहते या चित्रपटाची आतूरतेनं वाट पाहत होते. अखेर आज तो प्रदर्शित झाला असून त्यानं कमाल केली आहे.
वयाची सत्तरी पार केलेल्या रजनी यांचा वेगळा अंदाज या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळतो. हॉलीवूडमध्ये अॅक्शनपट करणाऱ्या काही अभिनेत्यांची जी एक सिग्नेचर स्टेप किंवा अॅक्शन असते तशी रजनी यांच्या त्या अॅक्शन किंवा स्टाईलची प्रचंड क्रेझ आहे. रजनी यांच्या जेलरनं त्यांना पुन्हा एकदा मेगा सुपरस्टार का म्हटले जाते, त्यांना देव म्हणून का पुजले जाते, त्यांच्या चित्रपटांना एवढा प्रचंड प्रतिसाद का मिळतो आणि निर्माते, दिग्दर्शक काही करुन एखादा का होईना चित्रपट त्यांच्यासोबत करायला मिळावा म्हणून का धडपडत असतात याची उत्तरं जेलरमधून मिळतात. रजनी यांनी या चित्रपटामध्ये कमाल केली आहे. त्यांचा गेटअप, लूक, स्टाईल, अॅक्शन हे सारं पाहिल्यावर आपण भारावून जातो.
Comments