top of page

विराट विश्वविक्रम (World Record)

  • harshcartoonist
  • Sep 4, 2021
  • 1 min read

#ViratKohli becomes 1st Indian to reach 150mn followers on Instagram


ree

जगभरातील क्रीडापटूंमध्ये विराटचा लागला चौथा नंबर


भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा गेल्या काही दिवसांपासून टीकेचा धनी ठरतोय. त्याला २०१९ नंतर एकही शतक ठोकता आलेले नाही. विराटला इंग्लंड दौऱ्यावरही अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. त्यामुळे विराटच्या फॉर्मबद्दलही चिंता व्यक्त केली जात आहे. कालपासून सुरू झालेल्या चौथ्या कसोटीत विराटने झुंजार अर्धशतक झळकावले. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार धावांचा टप्पा सर्वात जलद पारदेखील केला. अशा साऱ्या गोष्टी घडत असतानाच विराटने मैदानाबाहेरही एक विक्रम प्रस्थापित केला आहे.


  • Virat-Kohli-150M-Insta-Followers


विराट हा एक यशस्वी खेळाडू आहे यात वादच नाही. त्याची स्टाईल आणि त्याचा अँटीट्यूड हा कायमच चर्चेत असतो. सोशल मिडियावर त्याचे असंख्य चाहते आहेत. फोटोंसाठी प्रसिद्ध असलेल्या इन्स्टाग्राम या सोशल साईटवर त्याने १५० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. शुक्रवारी कोहलीने हा टप्पा गाठला. इन्स्टाग्रामवर १५० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार करणारा विराट हा पहिला भारतीय तसेच आशिया खंडातील पहिला व्यक्ती ठरला आहे. क्रीडा जगतात विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.


  • Cristiano Ronaldo - 337M

  • Lionel Messi - 260M

  • Neymar - 160M

  • Virat Kohli - 150M

 
 
 

Comments


bottom of page